MAHA TET 2024 अंतिम निकाल जाहीर – तपशील जाणून घ्या! -Result

MAHA TET 2024 अंतिम निकाल जाहीर – तपशील जाणून घ्या! -Result

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) 2024

MAHA TET 2024 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक 10 नोव्हेंबर 2024 रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 2024 चा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. पेपर I (इ. 1 ते इ. 5 वी) आणि पेपर II (इ. 6 वी ते इ. 8 वी) च्या निकालाची माहिती उमेदवारांना खालीलप्रमाणे तपासता येईल:ताज्या शैक्षणिक आणि सरकारी नोकरीच्या अपडेट्ससाठी महा नोकरी24 ला नियमित भेट द्या. MAHA TET 2024 निकाल संबंधित माहिती इतर उमेदवारांसोबत शेअर करा.

निकाल तपासण्यासाठी महत्त्वाच्या तारखा

  1. निकाल जाहीर होण्याची तारीख: 31 जानेवारी 2025
  2. ऑनलाईन आक्षेप नोंदवण्याची अंतिम तारीख: 6 फेब्रुवारी 2025

महत्त्वाच्या सूचना

  • परीक्षेच्या निकालाच्या आधारे गुणपत्रिका संकेतस्थळावर उपलब्ध असतील.
  • गुणांबाबत तक्रारी असल्यास किंवा आक्षेप असल्यास mahacet.in या संकेतस्थळावर 4 फेब्रुवारी 2025 ते 6 फेब्रुवारी 2025 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने नोंदवता येतील.
  • इतर कोणत्याही माध्यमातून आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.

आक्षेप नोंदवण्यासाठी ईमेल पत्ता

आक्षेप नोंदवण्यासाठी अर्ज mahacet24.msce@gmail.com या ईमेल पत्त्यावर पाठवा. आक्षेप पाठविताना 6 फेब्रुवारी 2025 ही अंतिम तारीख लक्षात ठेवा.

[CTET]- CTET Answer key and Objection-Result
MAHA TET 2024 Result2024Click Here

MahaNaukri24

MahaNaukri24 | Latest Govt Job 2025 | महा नोकरी | Current Jobs 2025

Click the share button to pass this information to your friends!