डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना संदर्भात महत्त्वाची सूचना
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना संदर्भात महत्त्वाची सूचना
काय आहे ही योजना?
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना’ अंतर्गत अनुसूचित जातीतील अशा विद्यार्थ्यांना, ज्यांनी इयत्ता दहावीत ७०% किंवा त्याहून अधिक गुण मिळवले आहेत, त्यांच्या उच्च शिक्षणाच्या पूर्वतयारीसाठी ₹2,00,000/- पर्यंत अनुदान देण्याची योजना आहे.

महत्त्वाची सूचना:
बार्टी, पुणे यांनी स्पष्ट केले आहे की, सदर योजनेसाठी कोणतेही अर्ज सध्या स्वीकारण्यात आलेले नाहीत. तसेच, या योजनेची अंमलबजावणी झालेली नाही. सोशल मिडिया, व्हॉट्सअॅप, किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून सदर योजनेबाबत पसरवले जाणारे माहितीपत्रके/फॉर्म चुकीचे आहेत. पालक आणि विद्यार्थ्यांनी अशा कोणत्याही गैरसमजांपासून सावध राहावे.
संस्था: डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे
परिपत्रक क्रमांक: जा.क्र./बार्टी/योजना/विविध-नोट/२०२४-२५/३२३१
दिनांक: २४ मे २०२५