MAHA TET 2025 | शिक्षक पात्रता परीक्षा अर्ज, तारीखा, फी आणि संपूर्ण माहिती
MAHA TET 2025 | शिक्षक पात्रता परीक्षा अर्ज, तारीखा, फी आणि संपूर्ण माहिती
Time Remaining
MAHA TET 2025
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत MAHA TET 2025 (Maharashtra Teacher Eligibility Test) ची अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.

ही परीक्षा प्राथमिक (Paper I) आणि उच्च प्राथमिक (Paper II) शिक्षक भरतीसाठी आवश्यक पात्रता निश्चित करण्यासाठी घेतली जाते. MAHA TET 2025 बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ जसे की अर्ज प्रक्रिया, पात्रता निकष, परीक्षा पॅटर्न, फी, महत्वाच्या तारखा, Admit Card, Result इत्यादी.
Eligibility Criteria (पात्रता निकष)
Paper I (क्लास 1 ते 5 शिक्षक):
- मान्यताप्राप्त संस्थेतून D.Ed किंवा B.El.Ed पूर्ण केलेले असावे.
- किमान 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक.
Paper II (क्लास 6 ते 8 शिक्षक):
- मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.Ed पूर्ण केलेले असावे.
- संबंधित विषयात पदवीधर असणे आवश्यक.
Important Dates (महत्वाच्या तारखा)
अ. क्र. | कार्यवाहीचा टप्पा | दिनांक व कालावधी |
---|---|---|
1 | ऑनलाइन आवेदनपत्र व परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी | 15/09/2025 ते 03/10/2025 |
2 | प्रवेशपत्र (Admit Card) प्रिंट काढून घेणे | 10/11/2025 ते 23/11/2025 |
3 | पेपर I परीक्षा तारीख व वेळ | 23/11/2025 – 10:30 AM ते 01:00 PM |
4 | पेपर II परीक्षा तारीख व वेळ | 23/11/2025 – 02:30 PM ते 05:00 PM |
Application Process (अर्ज प्रक्रिया)
Step 1: अधिकृत वेबसाइटला भेट द्या mahatet.in
Step 2: “New Registration” वर क्लिक करून नोंदणी पूर्ण करा.
Step 3: आवश्यक माहिती व कागदपत्रे Upload करा.
Step 4: परीक्षा फी भरून अर्ज सबमिट करा.
Step 5: अंतिम Application फॉर्मची प्रिंट काढा.
Exam Fees (परीक्षा फी)
फक्त एक पेपर (Paper I किंवा Paper II):
श्रेणी | फी (रु.) |
---|---|
अनुसूचित जाती (SC) | 700 /- |
अनुसूचित जमाती (ST) | 700 /- |
दिव्यांग उमेदवार (40% किंवा अधिक) | 700 /- |
इतर उमेदवार (OBC, EWS, General) | 1000 /- |
दोन्ही पेपर (Paper I + Paper II):
श्रेणी | फी (रु.) |
---|---|
अनुसूचित जाती (SC) | 900 /- |
अनुसूचित जमाती (ST) | 900 /- |
दिव्यांग उमेदवार (40% किंवा अधिक) | 900 /- |
इतर उमेदवार (OBC, EWS, General) | 1200 /- |
Exam Pattern (परीक्षेची रचना)
Paper I (Class 1 to 5):
- एकूण प्रश्न: 150
- एकूण गुण: 150
- वेळ: 2 तास 30 मिनिटे
- विषय: Child Development, Language I & II, Mathematics, Environmental Studies
Paper II (Class 6 to 8):
- एकूण प्रश्न: 150
- एकूण गुण: 150
- वेळ: 2 तास 30 मिनिटे
- विषय: Child Development, Language I & II, Mathematics/Science किंवा Social Studies
Admit Card (प्रवेशपत्र)
- Admit Card 10 नोव्हेंबर 2025 पासून अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध होईल.
- उमेदवारांना Application ID आणि Password वापरून Admit Card डाउनलोड करावे लागेल.
- प्रवेशपत्राची प्रिंट परीक्षा केंद्रावर बरोबर आणणे बंधनकारक आहे.
Result & Cut Off (निकाल व कट-ऑफ)
परीक्षा झाल्यानंतर MAHA TET 2025 Result डिसेंबर 2025 मध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे.
- Category नुसार Cut-Off व Merit List अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध होईल.
Helpline (फक्त तांत्रिक अडचणींसाठी)
- Helpline Numbers: 9028472681 / 9028472682 / 9028472683
- Email: mahatet2024msce@gmail.com
- वेळ: सोमवार ते शनिवार, सकाळी 10:00 ते संध्याकाळी 6:00 पर्यंत
Important Links (महत्वाच्या लिंक्स)
महत्वाची लिंक | क्लिक करा |
---|---|
अधिकृत Notification (PDF) | Download Here |
ऑनलाईन अर्ज करा | Apply Online |
Admit Card डाउनलोड करा | Download Admit Card |
FAQ (सर्वात जास्त विचारले जाणारे प्रश्न)
Q1. MAHA TET 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
Ans: 03 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
Q2. MAHA TET परीक्षा कधी आहे?
Ans: परीक्षा 23 नोव्हेंबर 2025 रोजी होणार आहे.
Q3. Negative Marking आहे का?
Ans: नाही, Negative Marking नाही.
Q4. Admit Card कधी उपलब्ध होईल?
Ans: Admit Card 10 नोव्हेंबर 2025 पासून उपलब्ध होईल.
Q5. अर्ज करताना कोणते documents आवश्यक आहेत?
Ans: फोटो, सही, शैक्षणिक प्रमाणपत्रे, जात प्रमाणपत्र (जिथे लागू आहे).
Preparation Tips
- मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवा.
- वेळ व्यवस्थापनावर विशेष लक्ष द्या.
- महत्वाचे विषयांचा वारंवार सराव करा.
- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत सूचना नियमित तपासा.