BE/B.Tech इंजिनिअरिंग प्रवेशासाठी CET नंतरचं महत्त्वाचं पाऊल – CAP Registration 2025 सुरू झालं आहे!

BE/B.Tech इंजिनिअरिंग प्रवेशासाठी CET नंतरचं महत्त्वाचं पाऊल – CAP Registration 2025 सुरू झालं आहे!

Time Remaining

BE/B.Tech 28 जून 2025 पासून अधिकृतरित्या CAP Round नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली असून, सर्व पात्र विद्यार्थ्यांसाठी ही एक महत्त्वाची संधी आहे. या लेखात तुम्हाला मिळेल: CAP नोंदणीची तारीख, अंतिम मेरिट लिस्ट, कॉलेज वाईज कटऑफ, आणि आवश्यक डॉक्युमेंट्सची यादी. हे सगळं एकाच ठिकाणी!

BE/B.Tech इंजिनिअरिंग प्रवेशासाठी CET नंतरचं महत्त्वाचं पाऊल – CAP Registration 2025 सुरू झालं आहे!

BE/B.Tech इंजिनिअरिंग प्रवेशासाठी CET नंतरचं महत्त्वाचं पाऊल – CAP Registration 2025 सुरू झालं आहे!

BE/B.Tech CAP Registration 2025 – अर्ज कसा कराल?

  • mahacet.org किंवा https://fe2025.mahacet.org/StaticPages/HomePage या वेबसाईटला भेट द्या.
  • New Registration” वर क्लिक करा.
  • तुमची Personal Details, HSC/CET माहिती भरा.
  • Documents Upload करा.
  • सर्व माहिती पूर्ण भरल्यानंतर Submit करा

प्रक्रियातारीख
नोंदणी व अर्ज भरणे (MS/OMS Candidates साठी)28 जून 2025 ते 08 जुलै 2025 (सायं. 5:00 वाजेपर्यंत)
Final Merit List Display17 जुलै 2025

पूर्ण वेळापत्रक CET CELL च्या वेबसाईटवर लवकरच जाहीर होईल.

Document Scrutiny: Online की Physical?

CET CELL कडून यावर्षीही E-Scrutiny म्हणजेच Online Document Verification प्रक्रिया अवलंबण्यात येणार आहे. उमेदवारांनी आपल्या सर्व कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती (PDF/JPG) स्वरूपात पोर्टलवर अपलोड कराव्यात.

जर कोणाचं Scrutiny “Not Approved” आलं, तर अशा प्रकरणांमध्ये CET CELL कडून “Physical Verification Centre” जाहीर केली जातात, जिथे उमेदवारांना मूळ कागदपत्रांसह प्रत्यक्ष उपस्थित राहावे लागते.

Document List PDF – कोणती कागदपत्र लागतात?

खालील प्रमाणे मूळ कागदपत्रे स्कॅन करून PDF मध्ये अपलोड करावीत:

  • 10वी व 12वीची मार्कशीट
  • CET 2025 Scorecard
  • Jee Score Card
  • Domicile Certificate (राहिवासी दाखला) नसल्यास TC टाकावी
  • Caste Certificate / EWS (आवश्यक असल्यास)
  • Validty / Recept (असल्यास )
  • Non-Creamy Layer Certificate (OBC/SBC/ VJNT/DTA साठी)
  • Income Certificate
  • Nationality Proof (उदा. जन्म प्रमाणपत्र)
  • CAP Application Form printout
  • Defence Cert (असल्यास )

BE/B.Tech Information Brochure PDF – अधिक माहितीसाठी

CAP प्रक्रिया, आरक्षण धोरण, अभ्यासक्रम आणि प्रवेश प्रक्रिया याविषयी सर्व माहिती एकाच PDF मध्ये दिली जाते.

Information Brochure 2025 डाउनलोड करा

BE/B.Tech College Code / Branch Code List – कॉलेज व ब्रँच कोड कसे शोधाल?

  • mahacet.org वेबसाइटला भेट द्या
  • Institute Information” किंवा “College List with Codes” या पर्यायावर क्लिक करा
  • जिल्हा, कोर्स व शाखा निवडा
  • तुम्हाला कॉलेज कोड, ब्रँच कोड व सीट्स याची सविस्तर माहिती मिळेल
BE/B.Tech

विस्तृत कॉलेज यादी व कोड्स फी व कॉलेज ची संपूर्ण माहिती CAP portal वर उपलब्ध आहे

BE/B.Tech Engineering College Wise Cut-Off – मागील वर्षाचा अभ्यास फायदेशीर!

तुम्ही कॉलेज निवडताना मागील वर्षांचा कटऑफ पाहणे अत्यावश्यक आहे.
2024-25 चा CUT-OFF डेटा Round-wise खाली दिला आहे:

  1. Round 1 Final Merit List (MS): Download PDF
  2. Round 2 Final Merit List (MS): Download PDF
  3. Round 3 Final Merit List (MS): Download PDF
  4. यामधून तुम्ही तुमच्या गुणांनुसार संभाव्य कॉलेज निवडू शकता
  1. प्रत्येक फॉर्म माहिती नीट भरा – चुकीची माहिती नोंद झाल्यास CAP फेजमध्ये अडचणी येऊ शकतात.
  2. ऑनलाइन स्क्रूटनी असली तरीही, काही ठिकाणी Physical Verification सुद्धा होतो. त्यासाठी मूळ कागदपत्रे तयार ठेवा.
  3. Merit Based College Allocation मध्ये तुमचे CET Score आणि Category मुख्य भूमिका बजावते.

  • Final Merit List नंतर Candidate Login करा.
  • “College Option Form” → इच्छित कॉलेज क्रमाने जोडा.
  • क्रमवारी योग्य वाटत नसेल तर Drag-and-Drop करा, मग Freeze & Submit करा.
  • प्रथम पसंतीची सीट मिळाल्यास ₹१,००० सीट-अ‍ॅक्सेप्टन्स फी भरा; अन्यथा Betterment निवडा.

B.Ed साठी तयारी करत असाल, तर खालील लिंकवर क्लिक करून B.Ed CET 2025 ची स्टेप-बाय-स्टेप नोंदणी प्रक्रिया जाणून घ्या!

B.Ed CET 2025 नोंदणी कशी पूर्ण करावी: सोपी स्टेप-बाय-स्टेप मार्गदर्शिका.

.

CAP Registration म्हणजे काय?

CAP (Centralized Admission Process) ही महाराष्ट्रात इंजिनिअरिंग व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी CET नंतरची प्रवेश प्रक्रिया आहे. यामध्ये Merit List वर आधारित कॉलेज व कोर्सचे वितरण केले जाते.

BE B.Tech CAP Registration साठी कोण पात्र आहे?

उमेदवाराने 12वी (HSC) मध्ये Physics + Mathematics + Chemistry/Biology विषय घेतलेले असावेत.
CET 2025 किंवा JEE Main Paper 1 दिलेला असावा.
महाराष्ट्राचा Domicile असलेला भारतीय नागरिक असावा.

Group Total म्हणजे काय? तो का लागतो?

Group Total म्हणजे 12वीतील PCM (Physics + Chemistry + Maths) चे एकत्रित गुण. Merit List तयार करताना CET स्कोअर बरोबरच Group Total सुद्धा बघितला जातो, विशेषतः जर स्कोअर टाय झाला तर.

BE B.Tech CAP Registration कोणते डॉक्युमेंट्स लागतात?

10वी, 12वी मार्कशीट
CET/JEE Scorecard
Domicile Certificate
Caste Certificate (जर लागू असेल तर)
Income/Non-Creamy Layer (OBC साठी)
Nationality Proof
Passport Size Photos

College Code व Branch Code कुठे पाहायचा?

mahacet.org वर Institute Information किंवा College List With Code या विभागात पाहता येतो.

मी एजंटकडून फॉर्म भरू शकतो का?

शिफारस नाही. फॉर्म स्वतः किंवा विश्वासार्ह Cyber Café वरूनच भरावा. Agent किंवा Coaching Center कडून Admission विकत घेतल्यास फसवणूक होऊ शकते.

मी CET दिलं नाही, फक्त JEE दिलं आहे. मी पात्र आहे का?

होय, जर तुम्ही JEE Main (Paper 1) दिला असेल आणि इतर पात्रता अटी पूर्ण करत असाल, तर तुम्ही CAP साठी पात्र आहात. पण तुम्हाला cet cell वर फी भरावी लागेल.

Note: Keep visiting the official website for the latest updates.

Click the share button to pass this information to your friends!