Lila Poonawalla Foundation Scholarship 2025 | मुलींसाठी अभियांत्रिकी, नर्सिंग व पोस्ट ग्रॅज्युएशन शिष्यवृत्ती

Govt Scheme Uncategorized

Lila Poonawalla Foundation Scholarship 2025 | मुलींसाठी अभियांत्रिकी, नर्सिंग व पोस्ट ग्रॅज्युएशन शिष्यवृत्ती

लिला पूनावाला शिष्यवृत्ती काय आहे ?

Lila Poonawalla Foundation Scholarship 2025 ही मागील 30 वर्षांपासून गरजवंत मुलींच्या शिक्षणासाठी कार्यरत असलेली प्रतिष्ठित Non-Profit संस्था आहे. यावर्षी Academic Year 2025-2026 साठी Merit-cum-Need Based Scholarship जाहीर करण्यात आली आहे.

Lila Poonawalla Foundation Scholarship 2025

श्रीमती लीला पूनावाला आणि श्री फिरोज पूनावाला यांनी 1995 मध्ये या संस्थेची स्थापना केली आहे .
लिला पूनावाला ही शिष्यवृत्ती विशेषतः त्या विद्यार्थिनींसाठी आहे ज्यांना Engineering (B.E./B.Tech), B.Sc. Nursing आणि Post-Graduation कोर्समध्ये प्रवेश मिळाला आहे.

या शिष्यवृत्तीचा उद्देश महिला सक्षमीकरण आणि शिक्षणाद्वारे उज्ज्वल करिअर घडवणे आहे. व समाजात अमुलाग्र बदल घडवून आणणे आहे.

लिला पूनावाला हि शिष्यवृत्ती उपलब्ध असलेले जिल्हे

ही शिष्यवृत्ती फक्त खालील जिल्ह्यांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींसाठी लागू आहे:

  • पुणे (Pune)
  • अमरावती (Amravati)
  • वर्धा (Wardha)
  • हैदराबाद (Hyderabad)
  • बेंगळुरू (Bengaluru)

शिष्यवृत्ती महत्वाच्या तारखा

Information Broucher Download

जिल्हा / कोर्सनोंदणी सुरूनोंदणी समाप्तहार्ड कॉपी सबमिट करण्याची अंतिम तारीख
Pune – Engineering (B.E./B.Tech)OngoingOngoingOngoing
Pune – B.Sc. NursingOngoingOngoingOngoing
Wardha – EngineeringOngoingOngoingOngoing
Amravati – EngineeringOngoingOngoingOngoing
Bengaluru – EngineeringOngoingOngoingOngoing

टीप: ऑनलाइन फॉर्म लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवरच भरावा. मोबाईलवरून फॉर्म भरल्यास तांत्रिक अडचणी येऊ शकतात.

लिला पूनावाला शिष्यवृत्ती पात्रता काय आहे?

  • अर्जदाराचे वार्षिक कुटुंबीय उत्पन्न ₹5,00,000/- पेक्षा कमी असावे.
  • सरकारी शिष्यवृत्ती (MAHA-DBT) वजा केल्यानंतर वार्षिक फी ₹20,000/- पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
  • अर्ज शुल्क ₹300/- (Non-Refundable) आहे.
  • प्रथम वर्ष प्रवेश घेतलेल्या मुलींनाच शिष्यवृत्ती अर्ज करता येईल.

शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा

कोर्सजिल्हाकिमान टक्केवारी (10वी / 12वी / डिप्लोमा)वयोमर्यादा (जून 2025 पर्यंत)जास्तीत जास्त शिष्यवृत्ती रक्कम
Engineering (B.E./B.Tech)Pune, Hyderabad, Bengaluru70%20 वर्षे₹70,000/-
Engineering (Amravati, Wardha)60%20 वर्षे₹60,000/-
Direct 2nd Year (After Diploma)सर्व जिल्हे70% (10वी व डिप्लोमा)21 वर्षे₹60,000/-
B.Sc. NursingPune, Amravati, Wardha60%20 वर्षे₹80,000/-
Post-GraduationPune70% (Graduation)30 वर्षे

आवश्यक कागदपत्रे

  • वयाचा पुरावा: जन्म प्रमाणपत्र / पॅन कार्ड
  • Aadhar Card
  • 10वी, 12वी, Graduation किंवा Diploma चे Leaving Certificates
  • Admission Letter व College Fee Structure
  • कुटुंबाचे Income Proof
  • शेतकरी पालकांसाठी 7/12 उतारा

टीप: सर्व कागदपत्रांसह Hard Copy LPF ऑफिसमध्ये स्वतः उपस्थित राहून सबमिट करणे अनिवार्य आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया

Step-by-Step अर्ज प्रक्रिया – Apply Online

  1. अधिकृत वेबसाइटवर जाऊन नोंदणी (Registration) करा.
  2. मेलवर मिळालेल्या Username व Password ने Login करा.
  3. सर्व स्टेप्स पूर्ण करून फॉर्म भरावा.
  4. ₹300/- ऑनलाइन पेमेंट पूर्ण करा.
  5. फॉर्म प्रिंट करून, फोटो व स्वाक्षरी लावावी.
  6. आवश्यक कागदपत्रांसह LPF ऑफिसमध्ये प्रत्यक्ष जाऊन सबमिट करावा.

लिला पूनावाला ऑफिस पत्ते

फॉर्म भरते वेळी कुठली समस्या येत असेल किवा अधिक माहिती हवी असेल तर खालील आफिस ला भेट देवू शकता. कामकाजाचे तास: सकाळी 11 ते दुपारी 4 (सोमवार ते शनिवार)

  • Pune: Fili Villa, Baner, Near D-Mart, Pune – 411045
  • Amravati: Silver Height Apartment, Bypass Road, Amravati – 444601
  • Wardha: Yashwant Colony, Nagpur Road, Wardha – 442001
  • Hyderabad: Bagath Singh Nagar Phase 2, Kukatpally, Hyderabad – 500085
  • Bengaluru: Jayanagar, Bengaluru, Karnataka – 560069

महत्वाच्या सूचना

  • 2रा आणि 4था शनिवार ऑफिस बंद राहील.
  • अंतिम निवड व शिष्यवृत्तीची रक्कम Board of Trustees ठरवतील.
  • फसवणूक टाळण्यासाठी फक्त अधिकृत वेबसाइट वरूनच अर्ज करावा.
  • LPF कडून इतर कोणत्याही एजंट किंवा संस्थेला अधिकृतता नाही.

Internal Links

लिला पूनावाला शिष्यवृत्ती.

Lila Poonawalla Foundation Scholarship 2025 ग्रामीण तसेच शहरी भागातील मुलींसाठी शिष्यवृत्तीची सुवर्णसंधी आहे. अभियांत्रिकी, नर्सिंग किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्समध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींनी ही शिष्यवृत्ती नक्की अर्ज करावी आणि आपल्या शिक्षणाचा आर्थिक भार कमी करावा.


Author

  • Maha Naukri24

    MahaNaukri24 हे महाराष्ट्रातील सरकारी व खाजगी भरतीसंदर्भातील विश्वासार्ह व्यासपीठ आहे. आम्ही वेळोवेळी नोकरी जाहिराती, अडमिट कार्ड, निकाल व करिअर मार्गदर्शनाची माहिती निशुल्क पुरवतो.

Click the share button to pass this information to your friends!