MahaDBT Scholarship 2025 | Post Matric Scholarship साठी अर्ज प्रक्रिया आणि नवे नियम जाणून घ्या

Govt Scheme Uncategorized

MahaDBT Scholarship 2025 | Post Matric Scholarship साठी अर्ज प्रक्रिया आणि नवे नियम जाणून घ्या

MahaDBT Scholarship म्हणजे काय?

MahaDBT Scholarship ही महाराष्ट्र शासनाची Direct Benefit Transfer (DBT) योजना आहे. या योजने अंतर्गत विविध Post Matric Scholarship स्कीमद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत दिली जाते.

ही शिष्यवृत्ती विशेषतः SC, ST, OBC, SBC, VJNT, EBC, Minority तसेच खुला प्रवर्ग आणि इतर श्रेणींतील विद्यार्थ्यांसाठी आहे. MahaDBT पोर्टलद्वारे शिष्यवृत्तीची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते, ज्यामुळे पारदर्शकता राखली जाते.

Post Matric Scholarship या योजनेचा सर्व विदयार्थी लाभ घेतात ज्याचे वार्षिक उत्पन्न हे १. ५० पेक्षा कमी असेल असे विदयार्थी हे शिष्यवृत्ती साठी पात्र ठरतात आणि ज्या विदार्थ्यांचे उत्पन्न हे जास्त असेल आणि ८ लाखापेक्षा कमी असेल अशा विदयार्थ्यांना फ्रीशिप या योजनेचा लाभ मिळतो.

शासनाचा नवीन नियमावलीनुसार ८ लाख हि मर्यादा वाढवून १२ लाखापर्यंत करण्यात ची तरतूद बऱ्याच दिवसापासून सुरु आहे पण, वास्तविक पाहता विदयार्थी ज्या वेळेस ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी जातात त्या वेळेस ज्याचे उत्पन्न जास्त असेल असे विदयार्थी अपात्र ठरतात. याबद्दल शासनाने विदार्थाच्या व पालकांचा हिताचा निर्णय घेतला पाहिजे.

Post Matric Scholarship म्हणजे काय?

Post Matric Scholarship म्हणजे 10वी नंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती. ही शिष्यवृत्ती 11वी, 12वी, डिप्लोमा, डिग्री, पोस्ट ग्रॅज्युएशन, व्यावसायिक कोर्सेस यासाठी लागू आहे. उदा. अभियांत्रिकी (Engineering), वैद्यकीय (Medical), फार्मसी, आयटीआय (ITI), बीए, बीकॉम, बीएससी, एमए, एमबीए इत्यादी कोर्सेस.

कोणाला शिष्यवृत्ती मिळते?

  • महाराष्ट्र राज्यातील SC, ST, OBC, SBC, VJNT, EBCMinority Community विद्यार्थी.
  • विद्यार्थ्यांनी 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराचे वार्षिक कुटुंबीय उत्पन्न ही मर्यादा स्कीमनुसार असावी (उदा. SC/ST – ₹2.5 लाख, OBC/SBC – ₹1 लाख इ.)
  • महाराष्ट्रातील Government, Government Aided, Private किंवा Recognized संस्थांमध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी पात्र आहेत.

Post Matric Scholarship साठी लागणारी कागदपत्रे

  1. आधार कार्ड (Aadhar Card)
  2. जात प्रमाणपत्र (Caste Certificate)
  3. NCL प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  4. उत्पन्न प्रमाणपत्र (Income Certificate)
  5. रहिवास प्रमाणपत्र (Domicial Certificate) (स्वताचे नसल्यास कुतुबातील व्यक्तीचे लावू शकतो.)
  6. मागील वर्षाचे मार्कशीट (Marksheet)
  7. कॉलेज Alotment (Admission Letter) (ज्याची निवळ हि cet मार्फत झाली असेल असे विदयार्थी.)
  8. बँक पासबुकची प्रत (Bank Passbook)
  9. राहत्या पत्त्याचा पुरावा (Address Proof)
  10. कॉलेज फी रसीद / बोनाफाईट (Fee Receipt / Bonafied)
  11. शेवटचा वर्चाची टी. सी. (Laste Year TC Xerox)
  12. जात वेधता प्रमाणपत्र (Cast validty) (लागू असल्यास)
  13. आदेश क्रमांक (शेवटच्या कालेज मध्ये शिष्यवृत्ती घेतली आहे किवा नाही असे नमूद करून देतात )
  14. Small Family Declaration Form Parents

नवीन OTR Registration म्हणजे काय?

2025 पासून MahaDBT पोर्टलवर One Time Registration (OTR) सुविधा सुरू करण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना एकदाच Permanent Profile तयार करावी लागते. यामुळे प्रत्येक वर्षी नवीन नोंदणी करण्याची गरज राहत नाही.

OTR Registration का करावे?

  • भविष्यातील सर्व शिष्यवृत्तीसाठी एकाच ID ने लॉगिन.
  • दस्तऐवज वारंवार अपलोड करण्याची आवश्यकता नाही.
  • वेळ आणि त्रासाची बचत.

MahaDBT Scholarship अर्ज प्रक्रिया

  1. MahaDBT च्या अधिकृत वेबसाइटवर जा – https://mahadbt.maharashtra.gov.in
  2. “New Applicant Registration” वर क्लिक करा.
  3. मोबाइल नंबर व ईमेलद्वारे OTP Verification करा.
  4. OTR प्रोफाइल तयार करून आवश्यक दस्तऐवज अपलोड करा.
  5. योग्य Scholarship Scheme निवडा.
  6. अर्ज फॉर्म पूर्णपणे भरून सबमिट करा.
  7. सबमिट केलेल्या अर्जाची Acknowledgement Receipt डाउनलोड करून ठेवा.
  8. कॉलेजमार्फत अर्जाची पडताळणी (Verification) करून घ्या.

Post Matric Scholarship फॉर्म सबमिट झाला किंवा नाही कसे तपासावे?

बऱ्याच वेळेस असे बघायला मिळते, विदयार्थी एक वेळेस ऑनलाईन फॉर्म सबमिट करून तो कॉलेज मध्ये जाऊन जमा करतो त्यानंतर तो त्याकळे लक्ष सुद्धा देत नाही. नंतर बऱ्याच दिवसांनी त्याला बघायला मिळते माझा फॉर्म रिजेक्ट झाला आहे, अशा स्थितीत घाबरायचे काम नाही. ऑनलाईन आपल्या फॉर्म मध्ये काय त्रुटी आहे ते बघावे व ती त्रुटी बघून परत सबमिट करावी. व आपल्या कॉलेज मधील सभंदीत व्यक्ती (Clerk) ला सूचना द्यावी. व ते एकदा परत चेक करून ऑनलाईन फॉर्म समोर पाठवतील .

Post Matric Scholarship द्वारे मिळणारे फायदे

  • ट्युशन फी, परीक्षा फी, मेंटेनन्स अलाऊंस यावर सबसिडी.
  • गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन.
  • शिक्षणाचा आर्थिक भार कमी होतो.
  • थेट बँक खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम जमा.

इतर शिष्यवृत्ती कोणत्या आहे?

Lila Poonawalla Foundation Scholarship 2025 | मुलींसाठी अभियांत्रिकी, नर्सिंग व पोस्ट ग्रॅज्युएशन शिष्यवृत्ती


MahaDBT Post Matric Scholarship 2025 ही महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची योजना आहे. OTR नोंदणीमुळे प्रक्रिया आणखी सोपी आणि पारदर्शक झाली आहे. सर्व पात्र विद्यार्थ्यांनी ही शिष्यवृत्ती अर्ज करून आपल्या शिक्षणाचा आर्थिक भार कमी करावा आणि उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण करावे.

Author

  • Maha Naukri24

    MahaNaukri24 हे महाराष्ट्रातील सरकारी व खाजगी भरतीसंदर्भातील विश्वासार्ह व्यासपीठ आहे. आम्ही वेळोवेळी नोकरी जाहिराती, अडमिट कार्ड, निकाल व करिअर मार्गदर्शनाची माहिती निशुल्क पुरवतो.

Click the share button to pass this information to your friends!